shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वरिष्ठ व निवड श्रेणी सुलभकांच्या प्रशिक्षणाची सांगता

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, संगमनेर व जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी सुलभकांच्या प्रशिक्षणाची कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे नुकतीच सांगता झाली. 

महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित या वरिष्ठ व निवड श्रेणी सुलभकांच्या प्रशिक्षणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील १६८ पेक्षा अधिक सुलभक सहभागी झाले होते. 

दि. २६ ते २९ मे २०२५ या कालावधीत प्रभारी प्राचार्य डॉ. लक्ष्मण सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रशिक्षणामध्ये दररोज पाच सत्रांमध्ये तासिकांचे आयोजन केले होते. अरुण भांगरे, संदीप वाकचौरे, डॉ. कैलास सदगीर, रामेश्वर लोटके, प्रकाश पारखे, अनमोल होन डॉ. सदानंद डोंगरे, डॉ. अरविंद सगभोर, सुनीता इंगळे आदींची व्याख्याने या प्रशिक्षणात झाली. या प्रशिक्षणानंतर दि. २ ते १२ जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये शिक्षकांचे प्रत्यक्ष वरिष्ठ व निवड प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या स्तरातून २१४३ शिक्षकांनी नोंद केली आहे. या शिक्षकांचे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, विषय साधन व्यक्ती व समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तालुकास्तरावर होणार आहे. 
या प्रशिक्षणाच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी अधिव्याख्याता डॉ. कैलास सदगीर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. याप्रसंगी वरिष्ठ व निवड सुलभकांच्या वतीने सर्व अधिव्याख्याते व प्रमुख सुलभकांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अहिल्यानगर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव, राहाता तालुकाध्यक्ष व मराठी विषय शिक्षक महासंघाचे अहिल्यानगरचे अध्यक्ष डॉ. शरद दुधाट यांच्या हस्ते प्रातिनिधिक वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जालिंदर गागरे, विजय देशमुख, सुनील लोमटे, अमोल चंदनशिवे, महेश पाटेकर हे उपस्थित होते. 
हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे, डॉ. कैलास सदगीर, रामेश्वर लोटके, अनमोल होन, मुकुंद दहिफळे, संजय दहिफळे, दिलीप दहिफळे, तंत्रस्नेही शिक्षक अमोल चंदनशिवे, महेश पाटेकर, श्रीमती काळे व समर्थ आदीनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर -9561174111
close