प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त केज तालुका भाजपच्या वतीने उतरेश्वर पिंप्री येथील उतरेश्वर महादेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर उतरेश्वर मंदिरात महाआरती करण्यात येऊन स्वछता मोहिमेची सांगता करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील विविध मंदिराचा जीर्णोधार करुन मंदिरातील देवी, देवतांचे पवित्र्य राखले होते. त्यांच्या त्रिशताब्दी जन्मोतस्वा निमित्त भाजपाच्या नेत्या तथा पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व आ नमिताताई मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी सकाळी 10 वाजता उतरेश्वर पिंप्री येथील उतरेश्वरमहादेव मंदिर परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली. व त्यानंतर उतरेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सुनिलआबा गलांडे , भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवानराव केदार, हभप नारायण महाराज, हभप पुरुषोत्तम महाराज, वसंतभाऊ केदार, नव्होलीचे सरपंच रंजित बिक्कड, सारणीचे सरपंच राहुल ओव्हाळ, काळेगावचे सरपंच अविनाश गाताडे, आरणगावचे सरपंच सचिन सिरसट, डोक्याचे सरपंच गोरख भांगे, सुरज घुले,दगडू दळवे, संतोष जाधव महादेव जाधवर, संभाजी गायकवाड,दिलीप गायकवाड,विष्णू राख, विकास शिंदे, ऍड उतरेश्वर नींगुळे, चेअरमन महेश चंदनशिवे, हनुमंत सुरवसे, मेजर हनुमंत वायबसे, भागवत वायबसे, श्रीराम वायबसे, चंद्रकांत भुजबळ, रवींद्र गलांडे, शिवाजी जाधव, राजाभाऊ पाटील,अप्पासाहेब देशमुख, गणेश मोकाशी, परमेश्वर भोसले, चंदरराव कोठावळे, प्रदीप घुले, उपसरपंच धीरज वनवे, उपसरपंच गोरोबा धेंडे, अशोक तांबडे, सुनिल शिंदे, महादेव देशमुख, सुभाष फुंदे, रत्नाकर कोल्हे, अशोक नींगुळे, मधुकर गात,दिनकर चंदनशिव, जगन्नाथ होळकर, नाना नेमट, अजय गुरव प्रदीप सपाटे, गंगाधर सत्वधर, दत्तात्रय गलांडे, राजाभाऊ उगले, संभाजी तांबडे, सतीश देशमुख, पांडुरंग गिते, दैवान सोनवणे, विकास जाधव, बापू कापरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.