shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात पतंजली योग समितीच्या* *वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा .*

*इंदापुरात पतंजली योग समितीच्या* *वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा .* 
इंदापूर : १ १ व्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पतंजली योग समिती, सोनाई परिवार व क्रेडाई संघटनेच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपालिकेजवळील प्राथमिक शाळा नंबर १ व २ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल नुसार योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. 
भारत स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष जयकुमार शिंदे पतंजलीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे क्रेडाईचे अध्यक्ष ॲड. जालिंदर बसळे सेक्रेटरी बाळासाहेब म्हेत्रे खजिनदार मुक्तार पठाण वसंतराव माळुंजकर मा .नगराध्यक्ष अशोक बापू इजगुडे प्रा. कृष्णा ताटे मा . नगरसेवक शेखर पाटील,मच्छिंद्र शेटे, ॲड. गिरीशजी शहा, मारुती मारकड, गोपीचंद गलांडे या उपस्थित मान्यवरांच्या व महिला प्रतिनिधींच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले.

 योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक प्रशांत गिड्डे, रामेश्वरजी साठे यांनी योगाचे मार्गदर्शन आणि योगाची प्रात्यक्षिके घेतली.
  योगा हा एक दिवस न करता तो  दैनंदिन जीवनात अंगीकारला पाहिजे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असावा. प्रत्येकाने आजच्या दिवशी दररोज योगा करण्याचा संकल्प करावा असे प्रतिपादन यावेळी जयकुमार शिंदे यांनी केले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये ९० किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्याबद्दल गोपीनाथ मोरे, संतोष वाकचौरे,संदीप जाधव यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परबत,शरद झोळ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक अनपट ,चंद्रकांत देवकर, हमीद आतार, भालचंद्र भोसले, बाजीराव शिंदे, विकास खिलारे ,किसन पवार, सायरा आतार, वर्षा ननवरे, रेखा भंडारी ,उमा झोळ,जयश्री सरोदे,जयश्री खबाले, वर्षा नागणे यांनी अथक परिश्रम घेतले 

*योगाचा प्रचार प्रसार करण्याचा हेतूने पतंजलीच्या  योगशिक्षकांनी ४८ विविध शाळा,विद्यालय, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, सरकारी दवाखाना यामध्ये  मोफत योगा शिकवला याचा लाभ अठरा हजार पाचशे विद्यार्थी आणि नागरिकांना झाला..*
close