shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हनुमान विद्यालय सुरवड येथे योग दिन साजरा.

हनुमान विद्यालय सुरवड येथे योग दिन साजरा.
इंदापूर:  दि. 21 जून जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयात वृक्षारोपण करून इंदापूर येथील पतंजली योग पिठाचे योग किसन दिवसे,प्रा.भिमाजी भोर, व सनीउकिरडे यांनी सूर्यनमस्कार भुजंगासन अर्धहालासन मंडूकासन योग मुद्रासन नौकासन कपालभाती प्राणायाम भामरी सिंहासन शांतीपीठ अशा वेगवेगळ्या योगासनाचे प्रकार करून दाखवलेले आहेत.विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. 
 यावेळी जि प प्राथशाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय तोरस्कर, हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक  चंद्रकांत कोकाटे,  संजय शिंदे, रखमाजी लोकरे, तानाजी राखुंडे, भागवत नाईक, अनिल पवळ, सौ सारिका खरात मोनाली कोरटकर, सौ अश्विनी सूर्यवंशी, सौ विनया गदादे, सौ सिंधू बनसोडे, सौ नीलिमा शिंगाडे आणि  डॉ. निंबाळकर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरवड व सुरवड गावातील ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. 
प्रस्तावना व आभार प्रकाश शंकर धुमाळ यांनी मानले.
----------------
फोटो ओळ : हनुमान विद्यालय सुरवड येथे योग दिन साजरा करताना विद्यार्थी.
close