जागतिक योग दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ विद्यालय वडापुरी या ठिकाणी योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके.
इंदापूर : दिनांक 21 जागतिक योग दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ विद्यालय,वडापुरी येथे योगासने व प्राणायाम याची प्रात्यक्षिके करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळच्या प्रसन्न आरोग्यदायी वातावरणात प्रार्थना घेऊन सुरुवात करण्यात आली. विविध प्रकारचे मुक्त हालचाली शरीर सज्ज करण्यात आले. ताडासन , वृक्षासन , त्रिकोणसन , चक्रासन , भुजंगासन अशी विविध आसने सफाईदारपणे केली. सूर्यनमस्कार सर्व कृतीनी पूर्ण केले. प्राणायाम मध्ये भसरिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, ओंकार उत्कृष्ट पद्धतीने केले. योगशिक्षिका सौ.प्रतिभा गुजराथी,सौ.मंदाकिनी गोडगे, . दत्तात्रय घाडगे,.हरिभाई गुजराथी ,.ब्रम्हदेव गवळी ,पोपट माने
यांनी योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती.पवार मॅडम यांनी केले होते.उपशिक्षिका सौ.शिर्के मॅडम यांनी माहिती सांगितली व इतर उपशिक्षक .खताळ सर,.थोरात मॅडम,श्रीमती. कासार मॅडम,.शिंगाडे सर, शिक्षकेतर
कर्मचारी .शिर्के सर,.मदने यानी सहकार्य केले.
-----------------
फोटो ओळ: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ विद्यालय वडापुरी या ठिकाणी योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके येताना योगशिक्षक व विद्यार्थी.