shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव या शाळेत जागतिक योग दिन साजरा.

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव या शाळेत जागतिक योग दिन साजरा.
    इंदापूर:  21 जून जागतिक योग दिनाचे 
औचित्य साधून अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयांमध्ये बालवाडी ते सातवी पर्यंतच्या वर्गाचे योगासने व प्राणायमाचे प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा केला 
 संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळच्या प्रसन्न वातावरणात, आरोग्यदायी वातावरणात प्रार्थना घेऊन योगासनाला सुरुवात केली शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली होण्यासाठी ताडासन, वृक्षासन,त्रिकोनासन,  हशासन वेगवेगळ्या प्रकारचे योगासन विद्यार्थ्यांनी केली.प्राणायणामध्ये अनुलोम,विलोम, भ्रामरीसन,  ओंकार, हास्यासन उत्तम प्रकारे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी केले.
संतोष  जाधव व अजित भरणे या शिक्षकांनी प्रात्यक्षिके करून दाखवले.शाळेचे मुख्याध्यापक छगन  पिसे,शिक्षक नवनाथ  कुंभार, लखन साठे,सुवर्णा  काळे, स्वाती   जगताप, विशाखा जोशी देवडे मॅडम व इतर पालकांनी योग दिनाचा लाभ घेतला.
---------
फोटो ओळ : अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव या शाळेत जागतिक योग दिन साजरा करताना.
close