shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके.
इंदापूर :दिनांक 21 जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  वडापुरी  येथे योगासने व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.
           सकाळच्या प्रसन्न आरोग्यदायी वातावरणात प्रार्थना घेऊन सुरुवात करण्यात आली. विविध प्रकारचे मुक्त हालचालीने शरीर सज्ज करण्यात आले. ताडासन , वृक्षासन , त्रिकोणसन , चक्रासन , भुजंगासन अशी विविध आसने सफाईदारपणे केली. सूर्यनमस्कार सर्व कृतीनी पूर्ण केले. प्राणायाम मध्ये भस्रीका अनुलोम विलोम, भ्रामरी, ओंकार उत्कृष्ट पद्धतीने केले.  मा शालेय व्यवस्थापन अध्यक्ष पोपट माने, मनिषा मोरे, प्रतिभा गर्कळ  यांनी योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखवली. उपशिक्षिक श्यामसुंदर माने यांनी योगाविषयी माहिती सांगितली. यावेळी महिला पालकांचे सहकार्य लाभले. 
-------------
फोटो ओळ: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके करताना विद्यार्थी व शिक्षक.
close