जागतिक योग दिनाच्या निमित्ताने रामवाडी शाळेत योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके.
इंदापूर :दिनांक 21 जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी रामवाडी येथे योगासने व प्राणायाम याची प्रात्यक्षिके करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळच्या प्रसन्न आरोग्यदायी वातावरणात प्रार्थना घेऊन सुरुवात करण्यात आली. विविध प्रकारचे मुक्त हालचाली शरीर सज्ज करण्यात आले. ताडासन , वृक्षासन , त्रिकोणसन , चक्रासन , भुजंगासन अशी विविध आसने सफाईदारपणे केली. सूर्यनमस्कार सर्व कृतीनी पूर्ण केले. प्राणायाम मध्ये भसरिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, ओंकार उत्कृष्ट पद्धतीने केले. उपशिक्षक युवराज यादव यांनी योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखवली.मुख्याध्यापिका सोनाली वाळूजकर यांनी माहिती सांगितली व अंगणवाडी सेविका उल्का पवार, मदतनीस विद्या फडतरे यानी सहकार्य केले.
------------
फोटो ओळ: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने रामवाडी शाळेत योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके करताना विद्यार्थी.