shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव पवार विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.

अनंतराव पवार विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.
इंदापूर : 21 जून 2025 जागतिक योग दिनानिमित्त अनंतराव पवार विद्यालय निरनिमगाव विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 
सकाळच्या प्रसन्न आरोग्यदायी वातावरणात परिपाठ घेऊन योगासनाला सुरुवात करण्यात आली. विविध प्रकारच्या मुक्त हालचाली  घेऊन शरीर सज्ज करण्यात आले. यामध्ये पद्मासन, लोलासन ,सर्वांगासन, हलासन , पर्वतासन ,वज्रासन, ताडासन ,वृक्षासन, शिर्षासन, शवासन, प्राणायाम ही सर्व आसने मोठ्या उत्साहामध्ये विद्यालयाचे योगशिक्षक  घोगरे सर व मुलाणी सर यांनी उत्कृष्टपणे प्रात्यक्षिक करून दाखवली. 
अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान निरनिम गाव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष  दत्ताजीराव घोगरे यांनी योग शिबिराला भेट दिली व सर्व विद्यार्थ्यांबरोबर त्यांनीही आसने केली .
विद्यालयाचे मुख्याध्यापक  .गरगडे बी .जे . यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना दररोज आसने करण्यासाठी प्रवृत्त केले. 
विद्यार्थ्यांबरोबर मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनीही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये योगासने केली. 
आंतरराष्ट्रीय  योगासनाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  .मोरे सर यांनी योग शिक्षकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
close