श्री शिवाजी विद्यालय बावडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न..
इंदापूर: शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.
नियमित योगा केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.योग एक प्राचीन भारतीय शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक सराव आहे.नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तसेच तणाव कमी होतो. योगामुळे ताण कमी होतो आणि मन शांत होते.एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. योगामुळे शरीरात सकारात्मक बदल होतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्य चांगले राहते.
यावेळी विद्यालयचे प्राचार्य . घोगरे डी.आर.सर, उपप्राचार्य .हासे सर, सौ. ताटे मॅडम सौ.सय्यद मॅडम यांच्या हस्ते सर्वच योग गुरूंचा सन्मान करण्यात आला.
पतंजली योग समिती इंदापूर चे योग गुरु .दत्तात्रय अनपट सर, तसेच हनुमंत बोराटे सर, राजश्री शिंदे मॅडम, सौ. अर्चना शेवाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, कपालभाती, अनुलोम-विलोम, तसेच प्राणायाम व योगासनांचे अनेक प्रकार यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच योगासनाचे महत्त्वही स्पष्ट केले.विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी या प्रात्यक्षिकाचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थी व शिक्षक, तसेच इतर सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी प्राचार्य श घोगरे डी आर सर यांच्या संकल्पनेतून प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून योगाची प्रतिकृती विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आलेली होती. यावेळी मुख्याध्यापक विनायक गुरव सर उपस्थित होते.
योगशिक्षिका सौ.शेवाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या आवारामध्ये योग गुरूंच्या शुभहस्ते 'वृक्षारोपण' करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलाणी एस.टी.सर यांनी केले तर आभार प्राचार्य घोगरे डी. आर.सर यांनी व्यक्त केले..
--------
फोटो ओळ: श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिना प्रसंगी विद्यार्थी व शिक्षक