*एल.जी. बनसुडे शैक्षणिक संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन चैतन्यपूर्ण वातावरणात व उत्साहात साजरा*
इंदापूर : पळसदेव-(ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा शिक्षिका धनश्री मदने मॅडम यांनी मुलांना योगाचे महत्व आपल्या जीवनामध्ये कसे आहे, योगा म्हणजे काय? योग्य प्रकारे तो कसा करावा या बद्दल सांगितले, तसेच योगा शिक्षिका निलम जांभळे मॅडम यांनी विध्यार्थ्यांना अनेक वेगवेगळे योगा प्रकार करून दाखवले. तसेच क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव, सतीश बनसुडे सर यांनी मुलांना अनेक वेगवेगळे व्यायाम करून दाखवत त्याचे महत्व ही सांगितले, या वेळी किरण काळे सामाजिक कार्यकर्ते भाजप पळसदेव ,प्रिन्सिपल वंदना बनसुडे मॅडम, मुख्याध्यापक राहुल वायसे सर,उपमुख्याध्यापक सुवर्णा वाघमोडे, तसेच सर्व विभाग प्रमुख व शिक्षक वृंद यांनीही मुलांसोबत योगा करून मुलांना योगाचे महत्व पटवून दिले आहे.