*नाशिक विश्रामगृहाच्या उपहारगृहात दरपत्रक चार्ट लावण्यात आला !!
*येथील ठेकादाराची टेंडर मुदत संपून तर कित्येक वर्ष झाले ?
*मग कोणाच्या आशिर्वादाने
अनाधिकृत उपहारगृहाचे चाले ?
नाशिक विशेष / प्रतिनिधी
नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह उपहार गृहात गेल्या अनेक वर्षापासून जाणिवपूर्वक दरपत्रक चार्ट लावलेले नव्हते,याचाच गैरफायदा घेत येथील उपहार गृह चालक आणी कामगार मोठा गैरफायदा उचलत मनमानी पद्धतीने दर अकारणी करुन अक्षरशः लुटमारच करत होते, मात्र साप्ताहिक खरे सव्वाशेर या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक लियाकतखान पठाण यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून याविरोधात वेळोवेळी सातत्याने आवाज उठवत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
अखेर साप्ताहिक खरे सव्वाशेर वृत्तपत्राचा सत्यसंघर्षाचा हा लढा आज यशस्वी झाला असून नाशिक येथील शासकीय विश्रामगूहाच्या उपहार गृहात दरपत्रक चार्ट लावणयात आला आहे.यामुळे भविष्यात याठिकाणी थांबणाऱ्यांची नक्कीच लुट होणार नाही हे जरी सत्य असले तरी हे दरपत्रक चार्ट शेवटी किती दिवस टिकणार? रातोरात गायब तर नाहीना होणार ? तथा दरपत्रकानुसारच अकारणी करण्यात येणार की पुन्हा मनमानी पद्धतीने लुटमार सुरु होणार? यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेहमी लक्ष ठेववे लागणार आहे.
कारण या ठिकाणच्या उपहारगृह ठेकेदाराची टेंडर मुदत संपून वर्षानूवर्ष उलटले असल्याचे समजते ,मग नेमके कोणाच्या आशिर्वादाने हे अनाधिकृतपणे उपहारगृह चालवले जात आहे?, की यामध्ये देखील कोण्या अधिकारी,कर्मचाऱ्याची भागीदारी अथवा आशिर्वाद आहे? हे देखील पडताळून पाहणे गरजेचे ठरत आहे,
करीता साप्ताहिक खरे सव्वाशेर कायमस्वरूपी यावर लक्ष ठेवून असणारच आहे, तथा जर दरपत्रक गायब झाल्यास पुन्हा आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आवाज उठविणार हे देखील तीतकेच सत्य आहे.
क्रमश: