JBVP’S, विद्यानिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनाची मान्यता : लाखेवाडी, इंदापूर तालुक्यात प्रथमच AI & ML इंजिनिअरिंग शाखेस सुरुवात
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयस शासनाची मान्यता मिळाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी ची स्थापना श्रीमंत ढोले सर यांनी केली. विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी देखील उपलब्ध झाल्या पाहिजेत व ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निर्मिती केली. शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये विद्यानिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयास All India Council For Technical Education ची मान्यता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, त्याचबरोबर तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांची मान्यता मिळाली असून चालू शैक्षणिक वर्षापासून (2025- 26) विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लाखेवाडी मध्ये चार विविध कोर्सेस सुरू होत असून ए आय अँड एम एल (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग), सिव्हिल इंजिनिअरिंग, इ एन टी सी(इलेक्ट्रॉनिक अँड टेलेकम्युनिकेशन), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेतील प्रत्येक शाखेमध्ये साठ विद्यार्थी क्षमतेस शासनाची मान्यता मिळालेली आहे.
ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणाच्या माध्यमातून देशातील व देशाबाहेरील विविध नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणारा असून या कॉलेजमुळे अनेक विद्यार्थी पालकांचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याचे स्वप्न साकार होणार असून स्वतःची व आपल्या पालकांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी या माध्यमातून मिळणारा आहे. श्रीमंत ढोले सर यांनी कॉलेज निर्मिती पाठीमागचा उद्देश हा विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये मोठ्या शहरात मिळणाऱ्या सर्व भौतिक सुविधा लाखेवाडी मध्ये उपलब्ध करून देऊन तज्ञ प्राध्यापकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल व या पुढील काळात देखील प्रत्येक वर्षी नवीन अभ्यासक्रम संस्थेत सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला. तसेच इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीला नवीन शैक्षणिक हब बनवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच ट्रेनिंग व भविष्यातील नोकरीच्या संधीसाठी विविध आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक कंपनी बरोबर सामंजस्य करार झाले आहेत. तसेच संस्थेत काम करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व आपण केलेल्या प्रयत्नामुळेच संस्थेला विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचे बळ मिळत आहे.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ चित्रलेखा ढोले, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेच्या सहसचिवा पौर्णिमा खाडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषीकेश ढोले व प्राचार्य डॉ सम्राट खेडकर, गणेश पवार, राजेंद्र सरगर, सर्व विश्वस्त, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.