*जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके.*
इंदापूर - बारामती : दिनांक 21 जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भिकोबानगर येथे योगासने व प्राणायाम याची प्रात्यक्षिके करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळच्या प्रसन्न आरोग्यदायी वातावरणात प्रार्थना घेऊन सुरुवात करण्यात आली. विविध प्रकारचे मुक्त हालचाली शरीर सज्ज करण्यात आले. ताडासन , वृक्षासन , त्रिकोणसन , चक्रासन , भुजंगासन अशी विविध आसने सफाईदारपणे केली. सूर्यनमस्कार सर्व कृतीनी पूर्ण केले. प्राणायाम मध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी, ओंकार उत्कृष्ट पद्धतीने केले. मुख्याध्यापक शिवमती स्वरांजली जगताप मॅडम यांनी योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखवली. शिक्षिका रोहिणी कोकरे यांनी माहिती सांगितली व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.