shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामविकास अधिकारी टि के जाधव प्रदिर्घ सेवेतून निवृत्त


 वडाळा महादेव [ वार्ताहर  ]  
 श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव परिसरातील लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय परिसरात वास्तव्यास असलेले तसेच श्रीरामपूर पंचायत समिती या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी पदावर तालुक्यात विविध ठिकाणी कर्तव्य बजावलेले टि के जाधव सध्या प्रदीर्घ सेवेतून बेलापूर येथुन निवृत्त झाले आहे  अगदी लहान पणापासून अध्यात्मिक कुटुबांत संगोपन झाल्याने  उच्च शिक्षण घेऊन जि प  या माध्यमातून अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले या कालावधीत अनेक संस्था  शासकिय  निमशासकिय यांचेकडून पुरस्कार प्राप्त झाले आहे.

 परन्तु सेवा समाप्ती नंतर आध्यात्मिक व वृक्षारोपन  संवर्धन याविषयी जनजागृती करणार असल्याचा मानस  निवृत्त ग्रामविकास अधिकारी टि के जाधव यांनी व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी काही ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा त्यांनी प्रयत्नही सुरू केला आहे या कार्याबद्दल महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज वारकरी सांप्रदायीक मंडळाच्या  श्री नंदकिशोर शेळके तसेच भजनी मंडळ यांच्याकडून त्यांचा विविध वृक्ष भेट देऊन ठिकाणी सन्मान करण्यात आला
close