shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्योजक विलास नलवड यांनीे जि प प्राथमीक शाळा पंधारवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅग चे केले वाटप.

उद्योजक  विलास नलवडे जि प प्राथमीक शाळा पंधारवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅग चे केले वाटप.
इंदापूर : प्रसिद्ध उद्योजक  विलास पंढरीनाथ नलवडे (नलवडे कलेक्शन अकलूज) यांच्या योगदानातून सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा परिषद शाळा पंधारवाडी व अंगणवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य (वह्या, पाटी ,पेन्सिल ,चित्रकला वही, रंग खडू,खोड रबर, पट्टी ,पेन्सिल ,पेन इत्यादी) वाटप करण्यात आले.
 याप्रसंगी पंधारवडी गावचे माजी सरपंच दिगंबर दशरथ निंबाळकर,  महेश नलवडे(पोलीस पाटील पंधारवाडी,वडापूरी), शिवाजी भोसले (माजी सरपंच वडापुरी, प्रल्हाद जाधव (श्रीनाथ वि का. स.सोसायटी. संचालक वडापुरी ),सचिन नलवडे, सुनील नलवडे,प्रवीण नलवडे, बाळासाहेब नलवडे, विपिन नलवडे तसेच.....
 शाळेचे मुख्याध्यापक  भारत कांबळे, शिक्षक परमेश्वर खंदारे सर,अंगणवाडी सेविका बालिका राऊत, मदतनीस सौ प्रणिता जगताप,गावातील महिला संध्या शेलार, अलका जगताप, शिल्पा भोसले, आशा भोसले, अलका निंबाळकर हे सर्वजण उपस्थित होते.

जि.प.शाळा पंधारवाडीच्या वतीने व पंधारवाडी गावच्या वतीने  विलास पंढरीनाथ नलवडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
close