श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न.
इंदापूर : श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न झाला.
यावेळी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक उदयसिंह पाटील व सर्व संचालक यांच्या हस्ते विद्यालयामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनायक गुरव सर व इतर शिक्षवृंद यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या गेटवर नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. तसेच बस चालक व पालक यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाच पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असे मत उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रवेशोत्सव प्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी संचालक संतोष सूर्यवंशी, पवन घोगरे, विठ्ठल घोगरे, रणजीत गिरमे,प्राचार्य दशरथ घोगरे , महाविद्यालयाचे प्राचार्य लहू वावरे , उपप्राचार्य हासे सर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक गुरव, पर्यवेक्षिका सौ.झेंडे मॅडम सर्व शिक्षक वृंद इतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.
सूत्रसंचालन एस.टी.मुलाणी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सयाजी मोहिते यांनी केले.
---------------------
फोटो ओळ : श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.