shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न*

*प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न*
इंदापूर :सोनाई परिवाराचे संचालक, पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती, इंदापूर तालुक्यातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेले युवा नेतृत्व श्री प्रविण दशरथ माने यांचा मंगळवार दिनांक १७ जून रोजी वाढदिवस पार पडला.
आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या युवा नेते प्रविण माने यांच्या वाढदिवसाची संपूर्ण तालुक्याभर चर्चा घडली. या चर्चेमागचे मूळ कारण म्हणजे तालुक्यातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय उपयोगी वस्तूंसाठीचा मदतीचा हात होय.

प्रविण माने युवा मंचच्या माध्यमातून प्रविण माने यांच्या समर्थक व मित्रपरिवारांच्या वतीने माने यांची तुला करण्यात आली असून त्यांच्या वजना एवढे शालेय साहित्याचे तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. 

समाजहिताचा विचार करून सातत्याने आपल्या कृतीतून समाजासाठी धडपडणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा आशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलेला सन्मान व त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या शुभेच्छा हे नक्कीच त्यांच्या कार्याचे एक प्रकारे कौतुकच करण्यात आले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे ही प्रविण माने यांची तालुक्यासाठी जी विशेष ओळख असून, त्यांच्या या कृतीतूनच संपूर्ण इंदापूर तालुक्यातील मित्रपरिवार त्यांच्याशी जोडला गेला असल्याचे मत त्यांच्याच एका सहकाऱ्यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला येताना कुणीही हार, पुष्पगुच्छ व इतर कुठलीही भेटवस्तू न आणता, शालेयवस्तू आणाव्यात असे आवाहन प्रविण माने यांच्यावतीने करण्यात आले होते, त्यानुसार नागरीकांनी या उपक्रमात सहभागी होत, शालेय वस्तूंनी पूर्ण मंडप भरवल्याचे दृश्य श्री माने यांच्या निवासस्थानी निर्माण झाले होते.

याचसह प्रविण माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुई येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ४५० हून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन झाले आहे. तसेच माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या काही दिवसात इंदापूर, पळसदेव, रेडणी या ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडणार असून दरवर्षी या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत प्रविण माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो.
close