एरंडोल:- तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस गजानन महाजन या १३ वर्षीय बालकाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दि.१७ जून रोजी सकाळी ८ वाजता मृतदेह आढळून आला होता.
काल या कुटुंबाची आमदार अमोलदादा पाटील यांनी सात्वंन भेट घेतली होती. या घटनेवेळी ते मुंबईला असतांनाच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.महेश्वरजी रेड्डी, स्थानिक पोलीस निरिक्षक निलेश गायकवाड यांचेशी त्यांनी संपर्क साधुन, यात जे कोणी दोषी असतील, त्यांचेवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्याचा सुचना केल्या होत्या.
तसेच आरोपींवर जो पर्यंत कुटुंयांचा मागण्यांनुसार कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा सातत्याने पाठपुरावा सुरु राहणार असुन, मी आपल्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी तेजसच्या कुटुंबियांसह उपस्थित ग्रामस्थांना दिला होता.
आज तेजसच्या वडिलांसह ग्रामस्थ मंडळीं समवेत आमदार अमोलदादा पाटील यांना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.महेश्वरजी रेड्डी यांची त्यांचा कार्यालयात भेट घेतली. यावेळी या प्रकरणाचा चौकशीत कुठलाही गय न करता जो कुणी आरोपी असेल त्याला कठोरात-कठोर शिक्षा द्यावी, प्रकरणाचा तपास हा जलद गतीने करण्यात यावा, तेजसचा कुटुंबियांसह ग्रामस्थांना या तपासात विश्वासात घेण्यात यावे यांसह तेजसचा कुटुंबाला न्याय मिळवुन देणेसाठी आवश्यक त्या बाबींचा सुचना यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी मा.पोलीस अधिक्षकांना केल्या.
या वेळेस जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील यांचेसह तेजसचे वडील, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.