shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • रश्मी ताई जाधव : समर्पित नेतृत्वाची तेजस्वी ओळख.
  •              🌍
  • वडार समाजासाठी समर्पित नेतृत्वाचा दीपस्तंभ : नितीन वाघमारे साहेबांचा अविरत संघर्ष
  •              🌍
  • आयसीसी मानांकनात भारतीय खेळाडूंची गगनभरारी
  •              🌍
  • शिर्डी शहरा मध्ये विविध सामाजिक संघटना , संस्था सामाजिक कार्यकर्ते यांचा स्नेह मिलन ..!
  •              🌍
  • वडार समाजाचे कैवारी आमदार अभिमन्यू पवार यांचे ऐतिहासिक योगदान...!
  • -->

    About Me

    डॉ. अतुलसिंह परदेशी : दोन दशके निष्पक्ष पत्रकारितेचा भक्कम स्तंभ !

    श्रीरामपूर / प्रतिनिधी:
    पिंपरी - चिंचवड - आज २४ जून हा दिवस महाराष्ट्र पत्रकार क्षेत्रात विशेष महत्त्वाचा. कारण आज आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रदेशाध्यक्ष आणि सामाजिक भान जपणारे निष्पक्ष पत्रकार डॉ. अतुलसिंह परदेशी यांचा वाढदिवस.

    जिद्द, चिकाटी आणि सामाजिक जबाबदारी यांचे उत्तम मिश्रण म्हणजेच डॉ. परदेशींचा पत्रकारितेचा प्रवास. तब्बल २० वर्षे ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या प्रभावी आणि तळमळीच्या पत्रकारितेमुळे असंख्यांना न्याय मिळाला आहे.

    *छत्रपतींच्या मातीची प्रेरणा, संघर्षांची शिदोरी:*
    डॉ. अतुलसिंह परदेशी यांचे बालपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगांव येथे गेले. तेथेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. उच्चशिक्षणानंतर त्यांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथे आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आणि त्या मातीशी इमान राखत पत्रकारितेचा वसा घेतला.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजातील विविध समस्या निर्भीडपणे मांडल्या. त्यांच्या पत्रकारितेने अनेक प्रश्न मार्गी लावले आणि हक्काच्या लढ्यात जनतेला बळ दिले. त्यामुळे त्यांना मराठवाडा रत्न पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, पत्रकारिता भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

    *दोन दशकांचा तेजस्वी पत्रकारितेचा प्रवास:*
    २००४ साली त्यांनी दैनिक गावकरीमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर पुढारी, प्रभात, लोकमत, पुण्यनगरी यांसारख्या अग्रगण्य दैनिकांतून त्यांनी प्रिंट मिडियात ठसा उमटवला. हे करत असतानाच ते जीवनातही संघर्ष करत राहिले. वडापाव विक्रीपासून पेट्रोल विक्रीपर्यंत विविध व्यवसाय त्यांनी अनुभवले.

    या संघर्षातून त्यांनी २०१४ साली ‘आपला आवाज’ न्यूज नेटवर्क या ग्रामीण चॅनलची स्थापना केली. किल्ले शिवनेरी या पवित्र भूमीतून सुरू झालेला हा प्रवास नंतर पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत पोहोचला. आपला आवाज न्यूज हे चॅनल आज संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सकारात्मक बातम्यांचे प्रभावी व्यासपीठ झाले आहे.

    *उद्योजकतेकडे वाटचाल आणि सामाजिक बांधिलकी:*
    पत्रकारितेबरोबरच त्यांनी स्थावर मालमत्ता व बांधकाम व्यवसायात पाऊल टाकले. जुन्नर या पर्यटन तालुक्यात त्यांनी हेलिकॉप्टर राईड सुरु करून स्थानिक पर्यटनाला चालना दिली.

    याचबरोबर त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. गरजू पत्रकारांना आर्थिक मदत, सामाजिक संस्थांना मदतकार्य, आणि नवनिर्माणात सक्रिय सहभाग हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे.

    रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे २०२२-२३ चे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व दिले.

    *प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्त्व:*
    डॉ. परदेशी हे केवळ पत्रकारच नव्हे तर ते एक दृष्टीकोन, एक प्रेरणा आहेत. त्यांनी नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे की, पत्रकारिता ही केवळ बातमी लिहिणे नाही, तर समाज घडवण्याचे माध्यम आहे.

    त्यांची पत्रकारिता ही सडेतोड, निर्भीड आणि निष्पक्ष आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी ही आजच्या धोकादायक आणि द्वेषमूलक वातावरणात फार मोठी प्रेरणा ठरते.

    डॉ. अतुलसिंह परदेशी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांनी जो निष्पक्ष पत्रकारितेचा वसा घेतला आहे, तो असाच फुलत राहो, बहरत राहो.

    छत्रपती शिवरायांच्या चरणी आणि किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवीच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अजून मोठ्या सामाजिक लढ्यांत यश मिळो हीच प्रार्थना!

    *शब्दांकन
    *डॉ. विश्वासराव आरोटे
     राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, संपादक दैनिक समर्थ गांवकरी

    *वृत्त प्रसिद्धी सहयोग
    समता मीडिया सर्व्हिसेस
     श्रीरामपूर - 9561174111
    close