shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपची विकसित भारत संकल्प सभा संपन्न.

भाजपची विकसित भारत संकल्प सभा संपन्न.

प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुक्याच्या वतीने विकसित भारताचा अमृत काळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याना ची 11 वर्ष जनता पार्टी महाराष्ट्र अंतर्गत विकसित भारत संकल्प सभा हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आमदार महेंद्रसिंग पाटील होते. या संकल्प सभेस जळगाव जिल्हा (पश्चिम) अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी संबोधित केले. तर एरंडोल - विखरण - रिंगणगाव मंडळाचे अध्यक्ष योगेश महाजन,एस.आर.पाटील, नानाभाऊ महाजन यांनी मोदी सरकारने केलेल्या कार्या बद्दल सविस्तर माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषण माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन अमरजितसिंग पाटील यांनी केले. तसेच संकल्प सभेनंतर वृक्ष रोपणाचाही कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर मोदी सरकारने केलेले विविध विकास कामे, योजना व त्यांनी केलेल्या कार्यावर उजाळा टाकण्यासाठी बॅनर प्रदर्शनी मांडण्यात आले होते. त्याप्रसंगी भिका कोळी,पल्लवी पाटील, समाधान पाटील,निलेश परदेशी,अविनाश जाधव, अजित पाटील,रवींद्र पाटील पारोळा, ॲड.मधुकर देशमुख,प्रमोद महाजन, संजय महाजन,अरुण महाजन,गोपाल महाजन, जगदीश ठाकूर,नरेंद्र ठाकूर, निखिल सूर्यवंशी,मयूर ठाकूर भारतीय जनता पार्टीचे एरंडोल शहरातील व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समितीचे संयोजक संदीप पाटील हे होते.

close