shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाऊले चालती पंढरीची वाट...ज्ञानोबा- तुकोबाच्या नामघोषात संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा वांबोरी मार्गे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान..!!

पाऊले चालती पंढरीची वाट...

ज्ञानोबा- तुकोबाच्या नामघोषात संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा वांबोरी मार्गे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 

मंगळवार २४  जून २०२५

जाता पंढरीसी सुख वाटे जिवा....

श्री क्षेत्र नाशिक ते श्री क्षेत्र पंढरपूर संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुकडे प्रस्थान..

वांबोरी  : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर,(नाशिक) ते श्रीक्षेत्र पंढरपूर भक्तीमय पालखी सोहळा अर्थात पायी वारी पंढरीची

श्री संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा राहुरी तालुक्यातील सडे-वांबोरी मार्गाने नगर मार्गे पंढरपूरच्या दिशेने ता.२१ रोजी मार्गस्थ झाला.

     ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषात वारीतील वारकरी मंडळी टाळ, मृदुंगाच्या आणि तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीतून  विठुरायाच्या भजनात दंग हत आपली तहान भूक विसरून पंढरीच्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होत भेटी लागे जीवा या अभंग वाणीचा प्रत्यक्ष अनुभव आला.

      यावर्षी भरपूर पाऊस होऊ दे, धनधान्य पिकु दे, शेतकरी राजा सुखी होऊदे, अवघ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे शेतकरी सुखी तर सर्व जण सुखी अशी मागणी घेऊन सहभागी वारकरी पंढरपुरच्या विठुराया चरणी नतमस्तक होण्याची आस बाळगून  हजारोंच्या संख्येने पायी चालत निघले.




ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषात वारीतील दंग झालेली वारकरी मंडळी टाळ,मृदुंगाच्या आणि तुकाराम महाराजांच्या अभंगात बा विठ्ठलाला भेटायला जातांना (छाया- दिपक हरिश्चंद्रे,वांबोरी)


       भाविकांना आणि पाहणाऱ्या प्रत्येकास भुरळ पडेल अशी अनोखी आणि उत्कृष्ट सजावट संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ  महाराज यांच्या  पालखी रथाला केलेली होती. या पालखी सोहळ्यात लहान मध्यम आणि वृद्ध असे तिन्ही पिढीतील वारकरी, महिला सहभागी झाले होते. यातून विठुरायाच्या भक्तीची आस किती आहे हेअधोरेखित होते.

     वारीतील सहभागी वारकरी मंडळींची भोजन,चहा,पाणी आणि नष्टाची व्यवस्था ही या मार्गावर असणाऱ्या, खडांबे खुर्द, प्रसाद शुगर कारखाना परिसर, पटारे पगारे वस्ती, वांढेकर वस्ती अनेक शेतकरी, कर्मचारी आणि भक्तगण यांनी केली तसेच वांबोरी ग्रामपंचायतिचे सरपंच किरण ससाणे आणि वांबोरी ग्रामपंचात  आणि अनेक तरुण मंडळाच्या वतीने नाश्ता, जेवण आणि सरबत व्यवस्था  करण्यात आली होती. या वर्षी या पालखी सोहळ्यात दर वर्षी पेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले होते. तसेच या वारी मार्गातील बहुतेक गावातील वारकरी याच दिंडीत सहभागी होत पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला गेले आहेत.


प्रसाद शुगर वांबोरी व्यवस्थापनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत...

प्रसाद शुगर वांबोरी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री तथा राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई  तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना  नाश्ता पॅकेट वाटप केले.

       यावेळी संचालक सुरेशशेठ बाफना, सरव्यवस्थापक अर्जुन माने, डिस्ट्रलरी मनेजर रवींद्र मेहेत्रे, वर्क्स मॅनेजर संजय म्हके, एच.आर. मॅनेजर शैलेंद्र काळे, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ वाघाडे,शेतकी अधिकारी सुदाम घुगरकर, मुख्यलेखापाल महावीर खोत, स्टोअर किपर आबासाहेब कल्हापूरे, चीफ केमिस्ट वालचंद मांडगे,गोडाऊन किपर अशोक चितळकर, पर्चेस विभाग अनिल दळवी,प्रशासन क्लार्क बबन पागिरे, रोखपाल श्रीनिवास फुगारे, डे.चीफ इंजिनिअर सोमनाथ कल्हापुरे, इंजी.अतुल चौधरी, प्रदीप सोडणर, टाईम किपर नितीन तनपुरे, राहुल तनपुरे, दर्शन गडाख, आदी. अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.निवृत्तीनाथ महाराज बेल्हेकर आणि ह.भ.प.कांचनताई जगताप यांच्या शुभहस्ते प्रसाद शुगर कारखान्याचा मिल रोलर पूजन कार्यक्रम पार पडला.


 अभंगात दंग होऊन बा विठ्ठलाला भेटायला जातांना वारकरी मंडळी...

(छाया- दिपक हरिश्चंद्रे,वांबोरी)

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close