मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या हटके कार्यशैलीने आणि सुसंस्कृत, प्रेमळ स्वभावाने परिचित असलेल्या रश्मी ताई जाधव या भाजपच्या वरीष्ठ पदाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा राजकीय प्रवास हा केवळ पदासाठी नसून सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेच्या मूल्यांसाठी सुरू झालेला एक प्रवास आहे.
रश्मी ताई जाधव यांनी आजवर तब्बल २० विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व करत भाजपचा विस्तार आणि बळकटीकरणाचे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे. त्यांच्या कार्यशैलीत संवेदनशीलता आणि निर्णयक्षमतेचा सुंदर समतोल पाहायला मिळतो. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते थेट पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वापर्यंत सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची आणि सर्वांना आपलेसे करण्याची त्यांची शैली कार्यकर्त्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
ताईंनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासासाठी विविध उपक्रमांद्वारे समाजाला दिशा दिली आहे. महिलांच्या हक्कासाठी, युवकांच्या प्रगतीसाठी आणि वंचित घटकांसाठी त्यांनी राबवलेले प्रकल्प उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांचे समाजातील नेटवर्क प्रचंड विस्तृत असून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे लाखो चाहते आणि अनुयायी आहेत.
रश्मी ताईंची कार्यपद्धती हळूहळू नव्हे, तर ठाम आणि ठोस पावले टाकणारी आहे. त्यांचे नेतृत्व केवळ भाजपपुरते मर्यादित नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा आवाज बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या गूगलवरील इतिहासातही त्यांच्या कार्याची चमक स्पष्टपणे दिसून येते.
या झुंजार नेतृत्त्वाचे भविष्यकालीन योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीला निश्नचितच वेगळे वळण देणारे ठरेल, यात शंका नाहीं.
रमेश जेठे सर
अहिल्यानगर
संपादक- शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा