shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.बाबुराब बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश..!!

डॉ.बाबुराब बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 

बुधवार ता.२५ जून २०२५

राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच डॉ. बाबुराब बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे आणि त्यांचे पुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मंगळवार २४ जून रोजी रात्री देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, ज्याला आज मुहूर्त मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी मध्यस्थीने हा प्रवेश सोहळा पार पडला.


        यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, अनिल सुराणा आदी प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, येत्या आठवड्यात अरुण तनपुरे यांना मानणारे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाही मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांनी अजित दादा गटात प्रवेश केल्यामुळे आता प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले या पक्षप्रवेशामुळे बाबुराव दादा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी अनेक राजकीय उलाढाल राहुरी तालुक्यात होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

 

close