कळंबचे सुपुत्र डॉ. सिद्धार्थ पवारने दंतचिकित्सक क्षेत्रात रोवला जगात मनाचा तुरा.
इंदापूर : कळंब गावचे सुपुत्र डॉ. सिद्धार्थ सुनील पवार, यांनी दंतचिकित्सक क्षेत्रात जगात मनाचा तुरा रोवला असून राबा बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे.
भारतातील क्रमांक 1 चे डेंटल कॉलेज चेन्नई दंतचिकित्सक महाविद्यालय.येथे डॉ. सिद्धार्थ सुनील पवार यांनी दंतचिकित्सक क्षेत्रात जागतिक विक्रम नोंदवला आहे.
एका दंत शाळेत पदवी पुर्व स्तरावर 6 महिन्यांच्या कालावधीत स्थिर अंशिक दंत उपचार सर्वाधिक संख्याने केले असून ते जागतिक वैयक्तिक वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याने त्यांना पुरस्कार प्रदान करून गौरवले आहे.
सदर पुरस्कार भारत, अमेरिका, युनायटेड स्टेट्स,ऑफ अमेरिका यां देशांतर्गत राबा बुक ऑफ वल्ड रेकॉर्डचे पुरस्कार वितरण संबंधित संस्थेचे कुलपती यांच्या उपस्थितीमध्ये मिळाला आहे. .
यामुळे कळंब आणि पंचक्रोशीतील परिसरातून डॉ. सिद्धार्थ पवार यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे..
डॉक्टर सिद्धार्थ पवार यांचे प्राथमिक शिक्षण, आपल्या गावी कळंब जिल्हा परिषद येथे झाले असून, पुढील शिक्षण पुण्यातील डी वाय पाटील येथे, तर पदवी शिक्षण चेन्नई येथील सविता मेडिकल कॉलेज झाले आहे. त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मेडिकल क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे,
यांनी आपल्या नावाबरोबरच गावाचा व देशाचा ठसा हा जगामध्ये उमठवीला आहे..
ही उल्लेखनीय बाब आपल्या गावाच्या व देशाच्या अभिमानाची बाब आहे..
आहे.