एरंडोल (प्रतिनिधी) | रिंगणगाव:
रिंगणगाव येथे 14 वर्षीय तेजस गजानन महाजन याची क्रूरपणे हत्या झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमागे नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत असून, हत्येची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तेजसचे वडील गजानन महाजन, काका किरण महाजन आणि इतर नातेवाईकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तेजसची गळा चिरून हत्या करण्यात आली असून, कंठ काढण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलीस तपासात अटक आरोपींकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हत्येचा कारण 'धक्का लागल्याने वाद' सांगितले जात असले तरी, हा युक्तिवाद केवळ खोटा आणि बनावट असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
⚖️ सखोल तपासाची मागणी:
1) हत्येची CID किंवा गुप्तचर खात्याद्वारे चौकशी व्हावी.
2) विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करावी.
3) मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यावर भर द्यावा.
4) अटक आरोपींकडून खरे कबूल करून घेण्यासाठी कठोर चौकशी व्हावी.
📌 गावात तणावपूर्ण शांतता:
घटनेनंतर रिंगणगावात तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
👥 निवेदन देताना उपस्थित:
तेजसचे काका किरण महाजन, जिल्हा परिषद माजी सदस्य नाना महाजन, माजी सरपंच गजानन महाजन, मेघराज महाजन यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.