shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजर्षी शाहु राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांना जाहीर...

अहिल्यानगर :- लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, कोल्हापुर यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा राजर्षी शाहु राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ सामाजिक क्षेत्रातील युवा नेतृत्व, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक / प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांना जाहीर झाला असून रविवार, दि.२९ जुन २०२५ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर  येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत. 
गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील नविन विज कनेक्शन, सौर क्रुषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर, वृक्षलागवड, विविध सामाजिक उपक्रम,  छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीउत्सवानिमीत्त भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते. शाहू महाराजांच्या जन्मोत्सवानिमीत्त वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाबरोबरच शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, विविध शासकीय योजना, जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीरांचे आयोजन,  ग्रामीण भागातील पाणी,रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिके बरोबरच जिल्हापरिषद, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विभागातील रस्त्यांच्या खड्डेमुक्तीसाठी वेगवेगळी आंदोलने, आमरण उपोषण, बहुतांश गावांच्या नेटवर्क समस्या सोडवण्यात मोलाचे योगदान, कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे उत्कृष्ट काम, मराठा आरक्षण विषयी स्पष्ट आणि आग्रही भुमिका, जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम करण्याची पद्धती यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे.

     ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असुन  तरूण पिढीसाठी एक आदर्श असाच आहे.
सामाजिक शिवकार्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श युवा समाजरत्न पुरस्कार-२०२१, राज्यस्तरीयआदर्श समाजसेवक-२०२२, राज्यस्तरीय आदर्श जनसेवक-२०२३, इंडियन युथ आयकॉन पुरस्कार-२०२३ या पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे.
close