शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार ता.३०/०९/२०२५
आहिल्यानगर (राहुरी) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय असणारे ओबीसी व्हिजेएनटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर असताना राहुरी तालुक्यात आले असता त्यांनी शिवसेना राहुरी तालुकाप्रमुख प्रशांत खळेकर यांच्या खडांबे येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका,नगरपरिषद तसेच ग्रामपंचायत निवडणुकीविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तसेच शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली. शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले बहुमूल्य योगदान देण्यासंदर्भात सूचना केल्या. तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांना आगामी निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सर्वांनी आपापसातले गटतट बाजूला ठेवून काम करण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.
याप्रसंगी ओबीसी व्हि जे एन टी उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप भोंडे,माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवकर, भा.ज.प. युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे,शिवसेना राहुरी तालुकाप्रमुख प्रशांत खळेकर (ओबीसी व्हीजेएनटी) तालुका उपप्रमुख अरुण जाधव,राहुरी शहर प्रमुख अमोल शिंदे,गीताराम जाधव, माजी. उपसरपंच अर्जुन खळेकर,गंगाधर खळेकर,विशाल खळेकर,ऋषिकेश खळेकर,ऋषभ खळेकर,विकास खळेकर,संकल्प पवार,अमोल पवार,अशोक जाधव, किरण जाधव,धीरज जाधव,सनी गायके,राजेंद्र घुगरकर,मिलिंद हरिश्चंद्रे, तसेच शिवसेना पदाधिकारी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

