shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आओ साई खंडोबा मंदिर वतीने श्री म्हाळसापती नागरे यांची पुण्यतिथी उत्सव तसेच कैलासवासी मनोहर मार्तंड नागरर यांचे पुण्यस्मरण विविध कार्यक्रम पार पडले

शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम कौतुकास्पद
 
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट , आओ साई खंडोबा मंदिर शिर्डीच्या वतीने श्री साई परमभक्त श्री म्हाळसापती चिमणाजी नागरे यांची १०३ वी पुण्यतिथी उत्सव तसेच गुरुवर्य कैलासवासी मनोहर मार्तंड नागरे सर यांचे पुण्यस्मरण विविध कार्यक्रम पार पडले.

अभिषेक पूजा म्हाळसापती महाराज मुर्तीची विधिवत पुजा साईनाथ विद्यालयाच्या गरजु गोर गरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मुख्याध्यापक अभिमन्यू डुबल सर रामभाऊ कोते बाळासाहेब कोते ज्ञानदेव उदावंत संतोष बोकण आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडले त्यावेळी बोलताना प्रभाकर कोते म्हणाले की
         ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम नामदार राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असण्याची त्यांनी सांगितले
       उत्सव सोहळ्याप्रसंगी सर्व खंडोबा भाविक , श्री साईभक्तांनी व शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित होते यावेळी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष संदीप मनोहर नागरे ,
        उपाध्यक्ष अजय नागरे , विश्वस्त दिपक नागरे , निलेश नागरे , अशोक नागरे , आशालता नांगरे श्रीकांत नागरे आदीसह कर्मचारी वृंद व म्हाळसापती चिमणाजी नागरे पूरिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले अध्यक्ष संदीप नागरे यांनी आभार मानले.
close