shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : रिक्षातून प्रवाशाचे २५ हजार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक अटकेत – ₹१.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त.

जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : रिक्षातून प्रवाशाचे २५ हजार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक अटकेत – ₹१.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने प्रवासी रिक्षातून प्रवाशाचे २५ हजार रुपये रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपींपैकी एकास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एकूण ₹१,५३,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली रिक्षा देखील आहे.

घटना कशी घडली...

फिर्यादी सद्दाम हुसेन बागवान (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता ते जळगावहून भुसावळकडे प्रवासी रिक्षाने जात होते. यावेळी त्यांच्या खिशातून दोन अनोळखी इसमांनी २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त माहितीवरून अटक...

दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने आरोपी शोयब हमीद खान (वय २५, रा. शाहुनगर, भिस्ती मोहल्ला, जळगाव) यास अटक केली. चौकशीत त्याने साथीदार प्रधुम्न उर्फ बंटी नंदु महाले (रा. खंडेराव नगर, जळगाव) व टोनी (रा. पिंप्राळा) यांच्यासोबत हा गुन्हा केलेची कबुली दिली.

जप्त मुद्देमाल...

आरोपी शोयब याच्याकडून त्याच्या वाट्याला मिळालेले ३ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ₹१.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, इतर दोन्ही साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. चौकशीत आरोपीने याच टोळीने जळगाव तालुका पोलीस ठाणे क्षेत्रातही अशाच चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

कारवाईतील पथक...

संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. शरद बागल, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, पोहेकों/विजय पाटील, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोहेकों/प्रविण भालेराव, पोहेकॉ/मुरलीधर धनगर, पोना/किशोर पाटील, पोकों/प्रशांत परदेशी, पोकों/रविंद्र कापडणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. तसेच तांत्रिक मदत पोकों/पंकज खडसे, गौरव पाटील व पोकों/मिलींद जाधव यांनी दिली.

close