नंदुरबार (दि. 12 सप्टेंबर 2025):
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शाखा नंदुरबार तालुका यांच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनाच्या दबावाखाली राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटियरवर आधारित शासन निर्णय (G.R.) काढला. हा शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगून तो तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या
- हैदराबाद गॅझेटवरून काढलेला शासन निर्णय त्वरित मागे घ्यावा.
- पक्षपाती भूमिका घेणारी न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी.
- शिंदे समितीमार्फत मागे दिलेल्या 58 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द कराव्यात.
- कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये.
- ओबीसी प्रवर्गात सुरू असलेली घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी.
परिषदेकडून इशारा देण्यात आला की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार राहील.
निवेदनावर स्वाक्षरी करणारे मान्यवर
श्री. राजेंद्र वाघ (जिल्हाध्यक्ष), श्री. रामकृष्ण मोरे (सरचिटणीस), श्री. मधुकर माळी (कार्याध्यक्ष), श्री. गणेश माळी (तालुकाध्यक्ष), श्री. पुंडलिक माळी (शहराध्यक्ष), मोहन माळी (माजी नगरसेवक), श्पंडित माळी (सामाजिक कार्यकर्ते), एजाज बागवान (जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन), भटू महाले (सामाजिक कार्यकर्ते, महात्मा फुले फाउंडेशन) यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
००००