शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार ता.१८/०९/२०२५
राहुरी : राहुरी शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था, सतत होणारे अपघात, आणि नागरिकांना होणारा त्रास याच्या विरोधात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. संस्थापक सौरभ उंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा राहुरी नगर परिषदेवर नेण्यात आला.
यावेळी सौरभ उंडे म्हणाले नवरात्र उत्सवाच्या आधी राहुरी शहरातील खड्डे न बुजवल्यास पुन्हा राहुरी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा त्यांनी प्रशासनाला इशारा दिला.,
यावेळी नाना शिंदे, सचिन बोरुडे,, जानवी उंडे,साक्षी लोळगे, सीमा उंडे नूतन उंडे आदींनी आपलेमनोगत व्यक्त केले.
कुलकर्णी हॉस्पिटल, शुक्लेश्वर चौक, विद्यामंदिर शाळा परिसर, शिवाजी चौक, आणि मेन रोड मार्गे नगर परिषद कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला. या मोर्चात महिलांचा आणि पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता.
दर पावसाळ्यात शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरतात, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागतो. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून याचा तीव्र संताप नागरिकांमध्ये दिसून आला.
मोर्चादरम्यान "खड्डे मुक्त राहुरी आमचा हक्क", "एकच नारा – खड्डे मुक्त राहुरी सारा", "प्रशासक हाय हाय", "कर भरतो आम्ही, रस्ता द्या तुम्ही", अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे, या आंदोलनादरम्यान एका युवकाने खड्ड्यात बसून खड्ड्यातील पाण्याने अंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
या मोर्चात सौरभ उंडे, सागर शेटे, ओंकार कासार, नाना शिंदे, सचिन ढवळे, सचिन राऊत, आरिफ शेख, जयंत उंडे, सागर उदावंत, अर्जुन बोराडे, निलेश शिरसाठ, अजिंक्य उदावंत, विलास कदम, प्रसाद भुजाडी, किरण सुराणा, वसीम आतार, सुनील निमसे, प्रल्हाद काशीद, सचिन उंडे, काकासाहेब आढागळे, प्रशांत कोळपकर, सचिन घाडगे,सचिन गुमास्ते, रवी तनपुरे,युवराज तनपुरेआदी उपस्थित होते.
महिला सहभागींच्या यादीत सीमा उंडे, नूतन उंडे, अनिता उंडे, जानवी उंडे, सुनिता शेटे, ताराबाई लोखंडे, इंदुबाई साळवे, प्रमिला कदम, सुनिता नालकर, युगंधरा शेटे, ज्योती लोळगे, सिंधू जंगम, सुनिता बर्डे, अश्विनी दहिवाळकर, प्रियंका जंगम, वैशाली कर्डक, साक्षी लोळगे, लता शेटे, पुष्पा शेटे, स्वाती ढवळे यांचा सहभाग होता.
मोर्चानंतर नागरिकांचे निवेदन प्रशासनाच्या वतीने विकास घट कांबळे यांनी स्वीकारले. नाथ प्रतिष्ठानच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून रस्त्यांची दुरुस्ती लवकर व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
यावेळी प्रशासक विकास घटकांबळे यांनी नाथ प्रतिष्ठांनला नवरात्र उत्सवाच्या आधी रस्त्याचे कामे केले जातील असे लेखी आश्वासन दिले आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600