shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा चेस असोशियनचे अध्यक्ष वसंत शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम दिवसाची सुरुवात


प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

सातारा: दि. १४/ सातारा जिल्हा चेस असोशिएशनचे अध्यक्ष श्री वसंत शिंदे यांनी राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ शालेय स्पर्धेच्या अंतिम दिवशी उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी असोशिएशनचे खजीनदार श्री मनोजकुमार तपासे यांच्यासोबत त्यांनी बुध्दीबळ खेळत स्पर्धेची सुरुवात करून दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री वसंत शिंदे बुद्धीबळ खेळ वृद्धींगत होण्यासाठी तसेच या खेळांतील होतकुरू खेळाडूंसाठी असोशिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. श्री वसंत शिंदे प्रख्यात गझलकार व कवी असून ते गेली तीस वर्षे अनेक संस्थांच्या माध्यमातून साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबवित आहेत. तसेच ते अनेक सामाजिक चळवळीतील संघटनांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहेत.

यावेळी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती विकास मोरे, सातारा जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार श्री मनोजकुमार तपासे, इंटरनॅशनल आर्बिटर शार्दुल तपासे, इतर अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
close