shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावड्यामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव' कार्यक्रमांतर्गत "किसान दिन" साजरा करण्यात आला.*

*बावड्यामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव' कार्यक्रमांतर्गत "किसान दिन" साजरा करण्यात आला.*
बावडा: इंदापूर तालुक्यातील बावडा येथे कार्यरत असलेल्या, रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज च्या कृषी कन्यांनी मंगळवार( दि.23 डिसेंबर 2025) रोजी 'ग्रामीण कृषी कार्यानुभव' (RAWE)  कार्यक्रमांतर्गत किसान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. "शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्या घामातूनच देशाची प्रगती घडते,"या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व विद्यार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांप्रती आदरभाव निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी दिनाच्या महत्त्वाविषयी माहिती देऊन करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या, आव्हाने व आधुनिक शेतीत त्यांचे स्थान यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अनुभवांबाबत माहिती घेतली.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी RAWE विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या जीवनाशी जवळून परिचय झाला व कृषी क्षेत्रातील सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. यावेळी कृषी कन्या कीर्ती कोळी, प्राची कोंडलकर, अनामिका कोळेकर, श्रद्धा जाधव, श्रद्धा इंगोले, प्रतिक्षा जाधव,सुनैना जाधव, साक्षी बोराटे यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे सर, तसेच प्रा.एस. एम. एकतपुरे , प्रा.एम. एम.चंदनकर  आणि प्रा. एच. व्ही.खराडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
close