shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“डिजिटल सावधगिरीचा मंत्र!” शास्त्री फार्मसीत सायबर क्राईम कार्यशाळा.

“डिजिटल सावधगिरीचा मंत्र!” शास्त्री फार्मसीत सायबर क्राईम कार्यशाळा.

ऑनलाईन फसवणूक, बनावट लिंकपासून बचावाचे पोलीस अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन.


“डिजिटल युगात सायबर सुरक्षितता ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी सजग राहणे अत्यावश्यक आहे.”
— डॉ. विजय शास्त्री, प्राचार्य



एरंडोल | दि. ८ जानेवारी —
शास्त्री फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर क्राईम विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. एरंडोल पोलीस ठाण्यातील ललित नारखेडे व दीपक राजपूत यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, सोशल मीडियाचा गैरवापर तसेच ओटीपी व पासवर्ड सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.

प्रत्यक्ष घडलेल्या घटनांच्या उदाहरणांमधून सायबर गुन्हे कसे घडतात व त्यापासून कसा बचाव करता येईल, हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सायबर गुन्ह्याची शंका आल्यास १९३० हेल्पलाईनवर तात्काळ तक्रार करावी व cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. सुमेश पाटील यांनी मानले. प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईमविषयी सजगता वाढल्याचे चित्र दिसून आले.

close