shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर जी देशमुख कृषी विद्यालय वाठोडा येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील "वाठोडा चांदस" येथील आर.जी देशमुख कृषी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला.
           वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभ  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजय देशपांडे होते तर दै.चुडामणी दर्शन चे संपादक व वरुड नगरपालिका स्वीकृत सदस्य प्रवीणभाऊ सावरकर तसेच प्रा. सुधाकर गावंडे सर व पालक प्रतिनिधी किशोर दळवी बेसखेडा तसेच पर्यवेक्षक एस.एन. राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

        ग्रामदैवत यशवंत माऊली यांच्या प्रतिमेच्या पूजनाने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजक व्ही. एम. बागडे सर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आरुषी मोरले, आरुषी भुसारी, रसिका गोहत्रे, ध्रुव वीरखरे, दीक्षा देशमुख, गुरुक्षा कावलकर या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. 
          प्रा. सुधाकर गावंडे व पत्रकार प्रवीण सावरकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वर्ग दहावीचे वर्ग शिक्षक पी. के. भुजाडे सरांनी व मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये  दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.

          "सक्षम" उपक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रदर्शनी मध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका कु.के एस. देशमुख मॅडम यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच संस्थेचे संस्थापक कै. रामराव गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित स्पर्धा परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
          या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सुंदर संचालन कु.जान्हवी गावंडे, कु.गुंजन डांगे यांनी तर ईश्वरी घोरमाडे व खुशी सदारंग या विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close