shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान एम्पलॉईज सोसायटीच्या वतीने पत्रकार संजय महाजन यांचा गौरव!


 माणुसकीचा आणि निस्वार्थी सेवेचा आदर्श

शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डीत दर्शन रांगेजवळ एका हताश साईभक्ताचे हरवलेले पैशांचे आणि अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांचे पाकीट कोणतीही अपेक्षा न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचा एक महान आदर्श ठेवणारे 'साईश्रद्धा प्रतिष्ठान'चे संस्थापक व अध्यक्ष श्री. संजय विठ्ठल महाजन यांचा 'श्री साईबाबा संस्थान एम्पलॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डी'च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. पैशांच्या मोहापेक्षा माणुसकी आणि प्रामाणिकपणा किती मोठा असतो, हे संजय महाजन यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेत सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाने त्यांचा विशेष सन्मान केला.
या मान्यवरांची होती उपस्थिती:
हा दिमाखदार सत्कार सोहळा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा. आणि व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी सोसायटीचे संचालक महादू बापूसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलिंद यशवंत दुनबळे, तुळशीराम रावसाहेब पवार पा., रवींद्र बाबू गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इक्बाल फकीरमहंमद तांबोळी, सौ. सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा. उपस्थित होते.
तसेच, सोसायटीचे सचिव विलास गोरखनाथ वाणी पा., सहसचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सहसचिव संभाजी सोपान कोते पा., सेवानिवृत्त कर्मचारी यमनाथ निर्मळ यांच्यासह सोसायटीचा सर्व कर्मचारी वर्ग या अभिमानास्पद क्षणी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आदरणीय संजय महाजन यांच्या या निस्वार्थी कृतीने संपूर्ण शिर्डीचा आणि साई संस्थानचा लौकिक वाढवला आहे. बाबांच्या 'श्रद्धा आणि सबुरी' या शिकवणीचा खरा प्रत्यय त्यांनी दिला असून, त्यांच्या या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
close