श्रीरामपूर : सोन्या-चांदीचे व्यावसायिक उमेश गणपतराव मैड यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. उमेश मैड हे मूळ श्रीरामपूर येथील रहिवाशी होते. गेल्या वर्षभरापासून ते अहिल्यानगर शहरातील केडगाव येथे स्थायिक झाले होते. संगमनेर येथे एका लग्नकार्यासाठी ते केडगाववरून निघाले असता नगर बायपासजवळ ०२ चारचाकी वाहनांचा अपघात होऊन त्यात उमेश मैड यांचा मृत्यू झाला.तसेच त्यांचे बंधू यांच्या देखील हाताला पायाला लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.तर समोरच्या वाहनातील नेवासा येथील काही जण जखमी असल्याचे समजते.
उमेश मैड यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी,भाऊ,दोन मुली,एक मुलगा असा परिवार असून श्रीरामपूर शहरातील सोन्या-चांदीचे व्यावसायिक सोमनाथ रघुनाथ महाले यांचे ते मेव्हणे होते.
०००

