shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"नियतीच्या दुःखात, व्यंकटेशचा आधार: मनाळ कुटुंबाला ५ लाखाची साथ..!!"

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,

दिपक हरिश्चंद्रे.

बुधवार  ता. २५/०३/२०२६

नियतीने हिरावलं, व्यंकटेशने तारलं..!

"नियतीच्या दुःखात,  व्यंकटेशचा आधार : मनाळ कुटुंबाला ५ लाखाची साथ..!!"

संस्थेच्या वतीने क्षेत्रीय अधिकारी मा. श्री. लक्ष्मण दारुंटे साहेब, शाखा व्यवस्थापक श्री. अविनाश बिरुटे, सेल्स मॅनेजर सौ. राणी काटकर यांच्या हस्ते अपघाती विमा योजनेच्या अंतर्गत ५ लाखांचा धनादेश सुपूर्द करतांना...!!

अहिल्यानगर : काळ कधी कोणाला आपल्यापासून हिरावून नेईल, हे कुणालाच सांगता येत नाही. व्यंकटेश मल्टीस्टेटचे खातेदार बाबासाहेब बंडू मनाळ यांच्यासोबत घडलेला अपघात ही अशीच एक हृदयद्रावक घटना ठरल आणि दुर्दैवाने त्यातच त्यांचे निधन झाले. कुटुंबासाठी हा धक्का शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आहे. त्यांचा मानसिक व आर्थिक आधार नियतीने काढून घेतला आहे. मात्र, त्यांनी व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये केलेली मुदत ठेव आज त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार बनली आहे...

अशा कठीण प्रसंगी, व्यंकटेश मल्टीस्टेटच्या अपघात विमा संरक्षण योजनेअंतर्गत त्यांच्या पत्नी श्रीमती नंदा बाबासाहेब मनाळ यांना संस्थेच्या वतीने क्षेत्रीय अधिकारी मा. श्री. लक्ष्मण दारुंटे साहेब, शाखा व्यवस्थापक श्री. अविनाश बिरुटे, सेल्स मॅनेजर सौ. राणी काटकर यांच्या हस्ते अपघाती विमा योजनेच्या अंतर्गत ५ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

  सदर ही रक्कम किंवा मदत दुःख कमी करू शकत नाही, पण कठीण काळात उभं राहण्यासाठी नक्कीच आधार देईल यात काही शंका नाही.

        या प्रसंगी शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी उपस्थित राहून, मनाळ कुटुंबीयांप्रती आपली संवेदना व्यक्त केली.



close