shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी: चिमुकल्यांच्या जगात 'फर्स्टक्राय'च्या नव्या भव्य शोरूमचे आज शानदार उद्घाटन!


अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सोहळा; डॉ. सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या 'अक्षयतृतीये'च्या अत्यंत मंगलमय पर्वावर शिर्डी शहराच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. लहान मुलांच्या आकर्षक कपड्यांसाठी आणि दर्जेदार साहित्यासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या 'फर्स्टक्राय' (Firstcry) या नामांकित ब्रँडच्या नव्या आणि भव्य शोरूमचे आज, रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता शिर्डीत दिमाखदार उद्घाटन संपन्न होत आहे. गोंदकर पाटील परिवाराच्या या नव्या व्यावसायिक वाटचालीने शिर्डी परिसरातील पालकांची मोठी सोय होणार आहे.
या भव्य उद्घाटन समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर या सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा. डॉ. श्री. सुजय (दादा) विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे.

कै. ज्ञानेश्वर शंकरराव गोंदकर पाटील यांच्या आशीर्वादरुपी छायेखाली हा भव्य उपक्रम आकारास आला आहे. आतापर्यंत आपल्या लहानग्यांसाठी ब्रँडेड कपडे, खेळणी आणि इतर वस्तूंसाठी शहराबाहेर जावे लागणाऱ्या पालकांसाठी आता 'फर्स्टक्राय'सारखा मोठा ब्रँड एकाच छताखाली सर्व उत्पादने घेऊन आला आहे. यामुळे परिसरातील पालकवर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या नव्या आणि अद्ययावत दालनाच्या प्रोप्रायटर सौ. अमृता शिवाजी गोंदकर पाटील या असून, श्री. तुकाराम शंकरराव गोंदकर पाटील, श्री. शिवाजी ज्ञानेश्वर गोंदकर पाटील आणि समस्त गोंदकर पाटील परिवाराने या भव्य सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केले आहे.
उद्घाटन सोहळ्याचे ठिकाण:
हा सोहळा हॉटेल साई विदीशा पॅलेस, कनकुरी रोड, शिवाजी नगर, शिर्डी (ता. राहाता) येथे संपन्न होईल.

तरी या आनंददायी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि नव्या शोरूमला सदिच्छा भेट देण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी, हितचिंतकांनी आणि मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अगत्याचे स्नेहनिमंत्रण समस्त गोंदकर पाटील परिवाराच्या वतीने देण्यात आले आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क: ९०२८९९००९८)
close