जळगाव / प्रतिनिधी:
अन्याय अत्याचार पिडीत यासोबतच सामाजातील रांजले - गांजले उपेक्षित आणी दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी राज्यभर कार्यरत असलेल्या "अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य" या राज्यव्यापी संघटनेच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी श्री. गायकवाड यांची निवड जाहीर करून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्याचा आराखडा स्पष्ट करण्यात आला. महाराष्ट्रभर माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, ग्राहक संरक्षण तसेच कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिक व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले याविरोधात संघटितपणे, लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असून कार्यकर्त्यांचे सक्षम जाळे निर्माण केले जाणार आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून भ्रष्ट नोकरशाहीचा पर्दाफाश करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्र तसेच शासकीय, निमशासकीय कामकाजामध्ये कुठेही भ्रष्टाचार आढळल्यास त्याविरोधात तक्रारी नोंदवून उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष केला जाईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी दिली.
दरम्यान, हेमकांत गायकवाड यांच्या या निवडीबद्दल अ.भा. स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,अखिल महाराष्ट्र वडार सेवा संघाचे प्रदेश महासचिव रमेश जेठे (सर), समता फाऊंडेशनचे उपाध्यक्ष तथा राहाता येथील ज्येष्ठ पत्रकार अजीजभाई शेख यांसह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार अजीजभाई शेख राहाता
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

