shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत साई- विठ्ठल भक्तीचा अनोखा संगम; सार्वजनिक कीर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन



ह.भ.प. एकनाथ महाराज चतर शास्त्री यांच्या प्रभावी कीर्तनातून भक्तीमय वातावरण रंगणार

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
शिर्डी परिसरात भक्तीचा दरवळ पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार असून साई व विठ्ठल भक्तांच्या वतीने भव्य सार्वजनिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. "शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रामावर" या भावनेतून साकार होणारा हा सोहळा भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरणार आहे.
दर महिन्याच्या शुद्ध एकादशी निमित्त आयोजित या कार्यक्रमात यावेळीही ह.भ.प. एकनाथ महाराज चतर शास्त्री (आळंदी) यांच्या ओजस्वी वाणीतून कीर्तन सेवा सादर होणार आहे. त्यांच्या प्रभावी प्रवचनातून साई व विठ्ठल भक्तीचा गोड संगम अनुभवायला मिळणार आहे.

हा कीर्तन सोहळा सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० वाजेपर्यंत साई निर्माण करिअर अकॅडमी ग्राउंड, श्रीकृष्णनगर, शिर्डी येथे पार पडणार आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, तसेच खिचडी प्रसादाचाही आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून श्री विजय तुलशीराम कोते (शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त) कार्य पाहत असून, संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी होणार आहे.

भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा शिर्डीकरांसाठी एक आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
close