सौ सायराभाभी आत्तार यांना वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण कार्यासाठी राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न हा पुरस्कार
इंदापूर: १ मे महाराष्ट्र दिना निमित्त .पुणे येथे राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव व पुरस्कार देऊन सत्कार . यामधे इंदापू येथील वृक्ष संजिवनी परिवाराच्या सौ सायराभाभी आत्तार .* यांना वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण कार्यासाठी राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न हा पुरस्कार सौ . भारतीताई तूपे व राजेंद्र पवार यांचे हस्ते देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी सायराभाभी आत्तार म्हणाल्या पर्यावरणातील वाढत्या तापमानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आज खरी गरज आहे वृक्षारोपणांकडे दुर्लक्ष केले
तर भविष्यात त्यांचे गंभीर परिणाम मानव सृष्टीला
भोगावे लागतील .त्यामुळे आपण एक व्यक्ती
एक झाड ही संकल्पना राबवली तर नक्कीच पर्यावरणात सकारात्मक बदल घडून येईल .कारण वृक्ष हे आपल्यासाठी
जीवनदायी आहे ते आपत्याला प्राणवायु , शुद्ध हवा देतात आणि वातावरण थंड ठेवण्यास मदत करून पावसाचे प्रमाणही संतूलीत ठेवतात .यावेळी राष्ट्रभक्तीचे राजेंद्र पवार ,
सौ . सुनिताताई किर्वे , डॉ . मंगेश पेंडामकर , मंगेश नागवडे पाटील संयोजक सुनिल गोरे , इ उपस्थित होते .

