shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महावितरणच्या विद्युत कामांत अनधिकृत मनुष्यबळाला लगाम घाला

अहिल्यानगर : महावितरणच्या विद्युत वाहिन्या, रोहित्र, डी.ओ. फ्यूज, मीटर व अन्य विद्युत उपकरणांवरील कामे अनधिकृत व्यक्तींकडून करून घेतली जात असल्यास त्यास तातडीने प्रतिबंध करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी माहिती अधिकार नागरी समूहाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाचपुते यांनी केली आहे.


महावितरणच्या संचालक (संचालन) कार्यालयाने परिपत्रक क्र. ३३२३०, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी अनधिकृत व्यक्तींकडून विद्युत यंत्रणेवरील कामे करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व विभाग व उपविभागांमध्ये या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पाचपुते यांनी केली आहे.

नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डी.ओ. फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीवरील बिघाड शोधणे, ग्राहकांच्या वीज तक्रारी सोडविणे तसेच मीटर काढणे आदी कामे अधिकृत व पात्र कर्मचाऱ्यांकडूनच करून घेण्यात यावीत. अनधिकृत व्यक्तींकडून अशी कामे करून घेतल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

Central Electricity Authority (Measures relating to Safety and Electric Supply) Regulations, 2023 मधील सुरक्षा तरतुदींनुसारही विद्युत कामांसाठी अधिकृत व पात्र व्यक्तींची आवश्यकता असल्याचे पाचपुते यांनी निदर्शनास आणले.

अहिल्यानगर जिल्ह्यात अचानक तपासणी मोहीम राबवून विद्युत काम करणाऱ्या व्यक्तींची अधिकृतता तपासावी, अनधिकृत मनुष्यबळाचा वापर आढळल्यास विभागीय चौकशी करून सेवाविनियमांनुसार कारवाई करावी तसेच यापूर्वी अशा प्रकारामुळे अपघात झाले असल्यास त्याची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी दीपक पाचपुते यांनी केली आहे.
close