shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थान सोसायटीच्या वतीने साईभक्तांच्या मोबाईलसाठी अत्याधुनिक ‘डिजिटल लॉकर’ सुविधेचा शुभारंभ!


भाविकांचे महागडे मोबाईल सुरक्षित राहावेत यासाठी सोसायटीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद – नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)

श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांना मोबाईल नेण्यास बंदी असल्याने त्यांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने अत्याधुनिक ‘डिजिटल मोबाईल लॉकर’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम साईभक्तांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सोसायटीच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यापूर्वी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे महागडे मोबाईल साध्या कापडी पिशव्यांमध्ये जमा करून घेतले जात असत. त्यामुळे मोबाईलच्या सुरक्षिततेबाबत भाविकांमध्ये चिंता निर्माण होत असे. ही अडचण लक्षात घेऊन भाविकांचे मोबाईल अधिक सुरक्षित राहावेत आणि त्यांना आधुनिक व विश्वासार्ह सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सोसायटीचे चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते व संचालक मंडळाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. बंगळूर येथील एका तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून श्री साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळ तब्बल ३०० अत्याधुनिक डिजिटल लॉकरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या अत्याधुनिक डिजिटल लॉकर सुविधेचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैय्या शेळके, नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर, नगरसेवक गणेश सोनवणे, साई मंदिर सुरक्षा विभागाचे प्रमुख रोहिदास माळी, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, बांधकाम अभियंता दाभाडे साहेब, आयटी विभागाचे गवळी साहेब, दैनिक लोकमतचे पत्रकार प्रमोदजी आहेर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून व नारळ फोडून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांच्याकडून उपक्रमाचे विशेष कौतुक!

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांनी सोसायटीच्या दूरदृष्टीपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत येतात. आजच्या डिजिटल युगात अनेक भाविकांकडे अत्यंत महागडे मोबाईल असतात. दर्शनासाठी जाताना हे मोबाईल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. भाविकांचा विश्वास कायम राखण्यासाठी आणि त्यांच्या मौल्यवान मोबाईलच्या सुरक्षिततेसाठी सोसायटीने अत्याधुनिक डिजिटल लॉकरची सुविधा सुरू करून एक कौतुकास्पद आणि अनुकरणीय पाऊल उचलले आहे. या सुविधेमुळे भाविकांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.’’

तसेच राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांनी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः केली डिजिटल लॉकरची चाचणी!

या सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी डिजिटल लॉकर प्रणालीची कार्यपद्धती जाणून घेतली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचा मोबाईल लॉकरमध्ये ठेवून या अत्याधुनिक प्रणालीची प्रत्यक्ष चाचणी केली. यावेळी त्यांनी संबंधित तंत्रज्ञान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकरच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. भाविकांना मोबाईल जमा करताना किंवा परत घेताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचा मौल्यवान वेळ वाचावा आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व सुरक्षित व्हावी, यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेला अनुसरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सोसायटीने टाकलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या सुविधेमुळे दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना आपले मोबाईल सुरक्षित ठेवता येणार असून, त्यांना अधिक निश्चिंतपणे साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.

विशेषतः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ही आधुनिक सुविधा म्हणजे साईभक्तांसाठी दिवाळीची एक आगळीवेगळी भेटच ठरणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सोसायटीचे संचालक मंडळ, पदाधिकारी व कर्मचारी वर्गाची उपस्थिती!

यावेळी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते, संचालक महादू बापूसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आराणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे, संभाजी शिवाजी तुरकणे, देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते, मिलिंद यशवंत दुनवळे, तुळशीराम रावसाहेब पवार, रविंद्र बाबू गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लव्हांडे, इक्बाल फकिरमहमंद तांबोळी, सौ. सुनंदा किसन जगताप, सौ. लता मधुकर बारसे, संभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लव्हांडे, सचिव विलास गोरखनाथ वाणी, सहसचिव बाबासाहेब शंकर अनर्थे, सहाय्यक सहसचिव संभाजी सोपान कोते यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close