अहमदनगर | प्रतिनिधी |
सदैव जनतेच्या हिताच्या निर्णयासाठी शासनाकडे भक्कमपणे पाठपुरावा करणारे म्हणून सवंध महाराष्ट्राला परिचित असलेले जनसामन्यांचे आदरस्थान व लोकनेते आमदार निलेश लंके यांनी कोरोना विषाणू आजाराच्या संदर्भात आज गोरेगाव येथील आरोग्य उपकेंद्रास भेट दिली.
त्यावेळी आरोग्य उपकेंद्रामधील वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,परिचारीका यांच्या सोबत विविध आरोग्य विषयक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
गावात बाहेरून कोणी आले आहे का ? त्यांची तपासणी केली का ? गावातील जबाबदार पदाधिकारी यांचा सहभाग मिळतो का ? गावात सध्याची परिस्थिती कशी आहे आदी विषयांबात सविस्तर माहिती घेतली व आरोग्य कर्मचारी,आशा सेविका यांची सुद्धा आस्थेवाईक पणे नम्रपुर्वक विचारपूस केली व
काही अडचण आली तर मला संपर्क करा व अडचण असेल तर मी स्वतः तेथे समस्या सोडविण्यासाठी येईल असे आदराने सांगितले.
यावेळी अभयसिंह नांगरे,संभाजीराजे नरसाळे,आप्पासाहेब नरसाळे,कुशनाथ नरसाळे,प्रविण नरसाळे,रोहीत तांबे,प्रितेश पानमंद, डॉ. भाग्यश्री उबाळे (समुदाय आरोग्य अधिकारी)
दळवी एस.एम. आरोग्य सेवक,
आशा सेविका शोभा तांबे,अनिता पानमंद, ज्योती नरसाळे,.मदतनीस मनीषा पातारे आदी उपस्थीत होते.




