shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकर्यांचे दुध संकलन बंद करून त्यांना वेठीस धरणारांवर कारवाई करा : आप्पासाहेब ढुस


देवळाली प्रवरा | प्रतिनिधी | 
       शेतकर्यांच्या प्रश्नांची थेट मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणारे प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतराष्ट्रीय खेळाडू तथा अध्यक्ष महाराष्टर राज्य तुकडे बंदी संघर्ष व समन्वय समितीचे आप्पासाहेब ढुस यानी याबद्दल थेट मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन पाठविले आहे , 
सदर निवेदन मुख्यमंत्री कार्यलयास पाठविले असून  सदर आशय खालीलप्रमाणे,
प्रति,
मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई 32 .




विषय - शेतकऱ्यांचे दूध संकलन बंद करून त्यांना वेठीस धारणारांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत.

आदरणीय महोदय, 
      कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकारने विविध निर्बंध लादलेले असताना  शेतकऱ्यांच्या हितासाठी दुधाचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून त्यास कलम १४४ मधून  वगळून त्याचे वितरण व वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला होता. 
      तथापी राज्यात दुधाचा तुटवडा निर्माण करून नफेखोरी करण्याच्या उद्देशाने आजच दुधाचे भाव पाडण्यासाठी  काही मंडळी सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून  पुढे दुधाची विक्री होत नसल्याचे कारण सांगून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यास मनाई केली जात आहे  किंवा आज ३४ रुपये भावाचे दूध २० रुपयांना देता का? नाहीतर तुमचे दूध नको अशी बतावणी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना नाहक वेठीस धरले जात आहे. 
    एकीकडे शेतकरी राजाला अवकाळी पावसाने झोडपल्याने हाती आलेले पीक वाया गेले आहे, तर दुसरीकडे नफेखोरी करू पाहणारांनी दूध खरेदी बंद केलेने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 
         करोना च्या बंदमुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता दुधावर अवलंबून असताना त्या दुधावर जर संकट ओढवले तर माझा शेतकरी बांधव मोडून पडल्याशिवाय राहणार नाही. दूध बंद झाले तर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे, दुसरीकडे दुभती जनावरे खाद्या अभावी जगवायची कशी या प्रश्नाने तारांबळ उडालेले शेतकरी उपाशी मारण्यापेक्षा जगण्यासाठी घराबाहेर पडतील, आणि नाविलाजास्तव कोरोनाने मरण पत्करतील.  त्यामुळे राज्यासमोर मोठी समस्या उभी राहू शकते. 
    सबब राज्यातील दूध उत्पादक शेतकरी बांधवांना वेठीस धरण्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले दुध संबंधित यंत्रणेस सक्तीने खरेदी करायला भाग पाडावे व त्याची पावडर किंवा इतर उप पदार्थ निर्मिती करावी.  आणि शेतकरी बांधवांची अडवणूक थांबवावी. तसेच दूध खरेदी करण्यास किंवा वितरण व्यवस्थेत अडवणूक करणाऱ्यांवर तक्रार आल्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत ही विनंती.
         कळावे..,
आपला विस्वासू
आप्पासाहेब भिमराज ढुस,
 प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू , तथा ..अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समिती,  मु. पो. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर.
close