shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनसे कार्यकर्त्यांकडून गोर गरीब जनतेला सहकार्य:

पंढरपूर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने कोरोनाच्या महामारी संकटाला तोंड देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरगरीब जनतेची गर्दी न करता फक्त दोन तीन कार्यकर्त्यांसमवेत सेवा करण्याचे काम करत आहे.

       अजनसोड, पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील निराधार, वृद्ध, जेष्ठ माता पित्यांना 1 महिना पुरेल एवढे अन्न धान्य गहू ,तांदूळ ,साखर, चहा पावडर, मास्क, इत्यादी साहित्याचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले,
यावेळी शिवाजीराजे पाटील, बाळासाहेब पाटील,समाधान शिरगिरे, रामा सुतार, समाधान दुबल,निलेश घाडगे, इत्यादी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

       यावेळी सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन दिलीपबापू धोत्रे यांनी केले ,घाबरून न जाता एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि कोणतीही अडचण असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी फोन वरून संपर्क साधा ,सर्वं सेवा मनसेचे कार्यकर्ते घरपोच देतील असे दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितले.
close