shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनावर मात मिळवण्यासाठी शिर्डी देवस्थानही पुढे सरसावले, शासनाला करणार ५१ कोटींची मदत

शिर्डी प्रतिनिधी :
    कोरोनावर मत करण्यासाठी आता शिर्डी देवस्थानही पुढे आले. शिर्डी देवस्थानच्या वतीने राज्य शासनाला ५१ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. न्यायलयाने नेमलेल्या कमिटीच्या निर्णयानंतर ही मदत राज्य शासनाकडे देण्यात येणार आहे. तसेच संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि गरजू लोकांसाठी देवस्थानच्या वतीने मोफत अन्नदानही करणार आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग धंदे बंद असल्याने संपूर्ण राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाला आहे. अशा काळात राज्याच्या तिजोरीवर अधिक ताण येत असतो.
त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि व्यावसायिक आर्थिक मदत घेऊन पुढे सरसावले आहेत. त्यातच शिर्डी देवस्थाननेही ५१ कोटींची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान कोरोना साथीच्या पार्श्व भूमीवर केंद्र आणि राज्य सरकारचा निधी या परिस्थितीमध्ये कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.असंघटित मजूर, बांधकाम कामगार शेतमजूर आणि कष्टकरी यांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे. मोठ्या शहरात त्यांना राहणे आणि जेवणाच्या साधनांपासून वंचित रहावे लागत आहे. आगामी महिन्यात देखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास या कष्टकऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या जीवनावर गंभीर संकट ओढवणार आहे.
close