shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवभोजन सारख्या योजना रामवाडीत राबवाव्यात भाऊसाहेब उडाणशिवे - जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन





वेब टीम नगर,दि.३१ - 

         साडे आठशे ते नऊशे कुटुंब असलेले म्हणजेच २००० पर्यंत लोकसंख्येची रामवाडीही  झोपडपट्टी शहरातली सर्वात मोठी झोपड्पट्टीये.येथे कचरा वेचक  , चिंधी वाले , विडीकामगार , धुनी भांडी करणाऱ्या मोलकरणी, झाडलोट सफाई मजूर असे विविध रोजंदारीवर काम करणारे मोठ्या संख्येने आहेत. या सगळ्यांची कामे सध्याच्या संचारबंदी - जमावबंदीमुळे बंद आहे. हातावर पोट असणारी ही लोकं बंद पळून कुटुंब सह शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत मात्र त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना पासून बचाव करताना उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. जिल्हाधिकाऱ्यांना माजी नगर सेवक भाऊसाहेब  उडानशिवे यांनी निवेदन दिले.अश्या लोकांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाच्या योजनांची रामवाडी झोपडपट्टीत अमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केले आहेत.


  
       सध्या शिवभोजन केंद्रही  बंद आहे ती सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. संचारबंदी च्या काळात ग्राहकांची संख्या कमानी असणार आहे त्यामुळे  शासनाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार. जर अशी केंद्र चालविणाऱ्यांनी रामवाडी सारख्या झोपडपट्टीत पार्सल थाळी पाठवल्यास त्याला मोठी मागणी राहील कारण झोपडपट्ट्यात जेथे अन्नच नाही तेथे थाळीची गरज आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी शिवभोजन थाळी केंद्रांना तसे आदेश द्यावेत अशीही मागणी निवेदनात केली आहे.  
close